1 June Team Lokshahi
ताज्या बातम्या

Rule Changes : 1 जूनपासून तुमच्यावर परिणाम करणारे हे बदल होणार

बँकांपासून तंत्रज्ञानापर्यंत काय बदल होणार जाणून घ्या...

Published by : Team Lokshahi

देशात 1 जूनपासून देशात अनेक बदल होणार आहेत. या बदलाचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि जीवनावर करणार आहे. जाणून घ्या 1 जूनपासून कोणते बदल होणार आहेत ते...

केंद्राच्या विमा योजना महागणार

केंद्र सरकारने मंगळवारी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या (PMSBY) प्रीमियममध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अधिकृत निवेदन जारी केले असून, नवीन प्रीमियम दर 1 जून 2022 पासून लागू होणार आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा प्रीमियम प्रतिदिन 1.25 रुपये केला आहे, त्यामुळे त्यासाठी आता 330 रुपयांऐवजी 436 रुपये प्रतिवर्षाला भरावे लागणार आहेत. तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम 12 रुपयांवरून 20 रुपये केला आहे.

Internet Explorer बंद होणार

एकेकाळी लोकप्रिय असलेले Internet Explorer ब्राउजर जून महिन्यात बंद होणार आहे. या ब्राउजरची लोकप्रियता कमी झाल्याने कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जूननंतर इंटरनेट एक्स्प्लोररला कायमचे बंद होईल. सध्या Google Chrome, Mozilla Firefox या ब्राउजरचा वापर केला जात आहे.

Amazon वरून पुस्तकांची खरेदी बंद

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून पुस्तकांची विक्री केली जाते. परंतु, 1 जून पासूनग्राहकांना ई-बुक्स खरेदी करता येणार नाही. नवीन गुगल प्ले स्टोर पॉलिसी (Google Play Store Policy)मुळे हा निर्णय झाला आहे.

SBI चे गृहकर्ज महागणार

स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जाचे एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) 40 बेसिस पॉईंट्सने वाढवला आहे. आता तो 7.05% केला आहे. त्याच वेळी, RLLR 6.65% अधिक क्रेडिट जोखीम प्रीमियम आहे. त्याचा परिणाम 1 जूनपासून गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ होणार आहे.

अ‍ॅपल बंद करणार कार्डचा वापर

Apple देखील १ जूनपासून आपल्या काही नियमांमध्ये बदल करत आहे. भारतात Apple आयडीचा वापर करून सबस्क्रिप्शन आणि अ‍ॅपची खरेदी करता येणार नाही. म्हणजेच, भारतीय ग्राहक क्रेडिट व डेबिट कार्डचा उपयोग करून अ‍ॅप स्टोरवरून अ‍ॅप खरेदी करणार नाही. सोबतच, आयक्लाउड+ आणि अ‍ॅपल म्यूझिक सारखे अ‍ॅपल सबस्क्रिप्शन कार्डने पेमेंट होणार नाही.

एटीएममधून कार्डशिवाय पैसे

एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढता येणार आहेत. आरबीआयने यासाठी नवीन नियम जारी केला आहेत. 1 जूनपासून मोबाइलच्या मदतीने एटीएममधून रोख रक्कम काढता येणार. या प्रक्रियेमध्ये यूजर्स विना डेबिट आणि क्रेडिट कार्डने एटीएममधून पैसे काढू शकतात. स्मार्टफोनचा वापर करून एटीएममधून पैसे काढता येणार आहे. यामुळे कार्डद्वारे होणारी फसवणूक टाळता येणार आहे.

थर्ड-पार्टी मोटर विमा प्रीमियम

थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये वाढ होणार आहे. बँकेचे नवे दर 1 जूनपासून लागू होतील. यामुळे आता तुम्हाला थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील.

गोल्ड हॉलमार्किंग

1 जून पासून अनिवार्य हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. सोन्याच्या दागिन्यांचे/कलाकृतींचे हॉलमार्किंग सध्याच्या 256 जिल्ह्यांमध्ये आणि असेईंग आणि हॉलमार्किंग केंद्र (एएचसी) द्वारे समाविष्ट आहे. या जिल्ह्यांत हॉलमार्किंगसह विक्री करणे अनिवार्य आहे.

पोस्ट बँकेच्या नियम बदलणार

इंडिया पोस्ट पेमेंट बँक या सेवेवर शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क 15 जूनपासून लागू होणार आहे. बदलानंतर, प्रत्येक महिन्याचे पहिले तीन व्यवहार विनामूल्य असतील. चौथ्या व्यवहारापासून प्रत्येक वेळी 20 रुपये अधिक GST द्यावा लागणार आहे. रोख पैसे काढणे आणि रोख जमा करण्याव्यतिरिक्त, मिनी स्टेटमेंट काढणे देखील व्यवहारात गणले जाईल. तथापि, मिनी स्टेटमेंटसाठी शुल्क 5 रुपये अधिक जीएसटी असेल.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड