रेल्वे अपघात आणि स्थानकावर लोकांसोबत झालेल्या घटनांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यातच आता एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस अचानक रेल्वे रुळावर पडलेला दिसतोय. त्याला पाहताच आरपीएफचे जवान त्याच्या मदतीला धावून जातात. जवान त्या व्यक्तीला रुळावरून उचलत असतानाच समोरून एक रेल्वे आली.
रेल्वे ट्रॅक ओलांडणं किंवा चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करणं घातक ठरू शकतं, अशा अनेक घटना बातम्यांमधून समोर येत असतात. मात्र तरीही लोक रेल्वे ट्रॅक ओलांडणं किंवा चालत्या ट्रेनमधून उतरणं थांबवताना दिसत नाही. अशातच सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये बंगळुरूमधील केआर पुरम रेल्वे स्थानकावर ट्रेन येण्याच्या काही मिनिटांपूर्वी एक माणूस रेल्वे रुळावर पडला.
मात्र, स्थानकावर उपस्थित आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे त्या व्यक्तीचा जीव थोडक्यात बचावला. व्हिडिओमध्ये दिसतंय की, तो रुळावर पडताच आरपीएफचे जवान त्याच्याकडे धाव घेतात आणि त्याला वाचवतात. जवान त्या व्यक्तीला वाचवत असतानाच समोरुन गाडी येते. यावेळी त्या व्यक्तीला जवान वर उचलतात, अन् थोडक्यात त्याचा जीव वाचतो. या व्यक्तीला वाचवण्यात काही सेकंदांचा जरी उशीर असता तर समोर येणाऱ्या गाडीखाली तो चिरडला गेला असता.