Arvind Kejriwal Bail Update : दिल्लीच्या कथित मद्य घोटाळा मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर राऊस अव्हेन्यू कोर्टाने केजरीवालांना जामीन मंजूर केला असून शुक्रवारी ते तिहार तुरुंगातून बाहेर येऊ शकतात. जामीनाला विरोध करण्यासाठी ईडीने ४८ तासांची वेळ मागितली आहे. तसच शुक्रवारी दोन्ही बाजूंनी युक्तीवादही केला जाणार आहे.
अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मद्य घोटाळ्याच्या मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात आरोपी होते. ईडीने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. लोकसभा निवडणुसाठी प्रचार करण्यासाठी केजरीवालांना याआधी न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला होता. त्यानंतर निवडणूक संपल्यानंतर त्यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. आता त्यांना नियमित जामीन मिळाला आहे.