Rohit Sharma 
ताज्या बातम्या

Rohit Sharma : हिटमॅनने रचला इतिहास! 'असा' ऐतिहासिक कारनामा करणारा ठरला भारताचा पहिला फलंदाज

Published by : Naresh Shende

चेन्नई सुपर किंग्जने रविवारी वानखेडे मैदानात झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा २० धावांनी पराभव केला. मुंबईचा पराभव झाला असला, तरी माजी कर्णधार रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कारनामा केला आहे. रोहितने आयपीएल करिअरचं दुसरं शतक ठोकलं. रोहितने ६३ चेंडूत १०५ धावांची नाबाद शतकी खेळी केली. टी-२० करिअरमध्ये रोहितचा हा आठवा शतक आहे. चेन्नईविरोधात शतकी खेळी करून रोहितनेल इतिहास रचला आहे. तसंच रोहित ५०० षटकार ठोकणारा भारताचा एकमेव फलंदाज ठरला आहे. तर विश्वक्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. ख्रिस गेल, पोलार्ड, आंद्रे रसेल आणि कॉलिन मनरोनं याआधी असा कारनामा केला आहे.

टी-२० मध्ये सर्वात जास्त षटकार

१०५६ - ख्रिस गेल

८६० - किरन पोलार्ड

६७८ - आंद्रे रसल

५४८ - कॉलिन मुनरो

५०० - रोहित शर्मा

४९४ - अॅलेक्स हेल्स

रोहित शर्माने १२ वर्षांनंतर आयपीएलमध्ये शतक ठोकलं आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ४ विकेट्स गमावून २०६ धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे धोनीने शेवटच्या षटकात ४ चेंडूत २० धावा कुटल्या. हार्दिकच्या गोलंदाजीवर धोनीनं वादळी खेळी केली आणि तीन चेंडूत तीन षटकार ठोकले. चेन्नईने दिलेलं २०६ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने ६ विकेट्स गमावून १८६ धावा केल्या. त्यामुळे मुंबईला चेन्नईविरोधात पराभवाचा सामना करावा लागला.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा