पुण्यात महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस ठाण्यासमोर शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.
फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर देखील या प्रकरणी कारवाई सुरू होती. यावेळी एका वाहनचालकाला अडवण्यात आले असून त्याला कागद पत्र विचारले असता त्याने रागाच्या भरात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर थेट पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, पुण्यात महिला पोलिस कर्मचाऱ्यालाच पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला.. असं होत असेल तर सामान्य माणसाची काय कथा? यामुळं गृहमंत्रालयाच्या 'चोख' कामकाजाबाबत आता प्रत्येक शहरात 'जाहीर प्रदर्शन' भरवण्याचीच वेळ आलीय! असे रोहित पवार म्हणाले.