ताज्या बातम्या

Rohit Pawar : म्हणून सामान्य लोकांनाच दबाव आणून या किडलेल्या व्यवस्थेवरच बायपास सर्जरी करावी लागणार आहे

Published by : Siddhi Naringrekar

कल्याणीनगर अपघात प्रकरणी रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले की, कल्याणीनगरमध्ये दोन निष्पापांना गाडीखाली चिरडल्यानंतर किडलेल्या संपूर्ण यंत्रणेचंच पितळ उघड पडलं. पोलिस विभागातील अधिकाऱ्यांचे कारनामे उघडकीस आले, डॉक्टरांनी हात धुवून घेतले, RTO ने डोळे मिटून दूध पिलं तर एक्साईज विभाग नशेत असल्याचं दिसलं.

बाल न्याय मंडळानेही ‘निबंध’ लिहायला सांगून दोघांचा बळी घेणाऱ्या आरोपीला एका दिवसात मोकळं सोडलं. एरवी रस्त्यावरच्या भाजीवाल्याकडूनही दंड वसूल करणाऱ्या महापालिकेलाही मग जाग आली आणि त्यांनी घाऊक स्वरुपात हॉटेलांवर कारवाई करुन हातावर पोट असलेल्या अनेक सामान्य कामगारांच्या नोकऱ्यांचा घोट घेतला. हे संपूर्ण व्यवस्था सडल्याचंच लक्षण आहे. इतरही सगळ्या विभागात हेच सुरु असून सामान्य लोकांसाठी काम करणं अपेक्षित असलेली ही व्यवस्था सरकार कुणाचंही असलं तरी केवळ पॉवरफुल लोकांना पायघड्या घालून त्यांच्यासाठीच काम करताना दिसते.

यासोबतच ते म्हणाले की, म्हणून सामान्य लोकांनाच दबाव आणून या किडलेल्या व्यवस्थेवरच बायपास सर्जरी करावी लागणार आहे. नाहीतरी आज त्या दोन मृतांना न्याय मिळण्याची जी काही शक्यता निर्माण झालीय तीही केवळ सामान्य लोकांच्या दबावामुळेच, हे विसरता येणार नाही. असे रोहित पवार म्हणाले.

Bacchu Kadu : 4 नोव्हेंबरला पूर्ण चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी