ताज्या बातम्या

नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेत घोषणाबाजी; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या दिंडोरीमध्ये प्रचार सभा पार पडली. या सभेच्यावेळी पंतप्रधान मोदींचे भाषण सुरु असताना एका तरुणाने कांद्यावर बोला अशी घोषणाबाजी केली. त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सभास्थळावरुन बाहेर नेलं. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, मा. मोदीजी शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेल्या मालाला भाव देण्याची मागणी शेतकरी कळवळून करतोय... पण ही जन की_बात ऐकण्याऐवजी पोलिसांच्या मदतीने त्या शेतकऱ्याचा आवाज तुम्ही दाबून टाकला आणि आपली #मन_की_बात रेटली..

पण ४ जून रोजी तुम्हाला जन की_बात चा आवाज इतक्या मोठ्या प्रमाणात ऐकू येईल की, त्या आवाजाने कानठळी बसल्याशिवाय राहणार नाही. असे रोहित पवार म्हणाले.

Bacchu Kadu : 4 नोव्हेंबरला पूर्ण चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी