ताज्या बातम्या

बारामतीत EVM मशीन ठेवलेल्या गोडाऊनमधील CCTV बंद; रोहित पवार म्हणाले...

बारामतीत EVM मशीन ठेवलेल्या गोडाऊनमधील CCTV बंद असल्याची घटना समोर आली.

Published by : Siddhi Naringrekar

बारामतीत EVM मशीन ठेवलेल्या गोडाऊनमधील CCTV बंद असल्याची घटना समोर आली. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, बारामती लोकसभा मतदारसंघातील #EVM ठेवलेल्या गोडवूनमधील #CCTV ४३ मिनिटं बंद असल्याची माहिती ही धक्कादायक आहेच पण काही गैरप्रकार करण्यासाठी तर जाणीवपूर्वक हा प्रकार केला नाही ना, अशी दाट शंका येते.

ज्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर आवश्यक असतं त्याप्रमाणे EVM च्या गोडावूनमध्येही CCTV यंत्रणा सुरू असणं आवश्यक आहे. निवडणूक आयोग कमी पडत असेल तर ही निवडणूक निष्पक्षपणे कशी म्हणता येईल? या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी झाली पाहिजे. असे रोहित पवार म्हणाले.

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Black circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result