भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे सतत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत असतात. याप्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकरांवर चांगलाच निशाणा साधला आहे.
रोहीत पवार म्हणाले की, गोपीचंद पडळकरांचं (Gopichand Padalkar) कर्तृत्व काय हे सांगलीतल्या (Sangli) पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्यावरच्या केसेस बघितल्या तर दिसेल. त्यांचे ठराविक कार्यकर्ते सोडले, तर त्यांच्या आरोपांना कुणीही महत्त्व देत नाहीत.
“गोपीचंद पडळकर वेगवेगळ्या आंदोलनात व्यस्त होते. त्यामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीसाठी अराजकीय स्वरूपाचा कार्यक्रम घेण्याचा विचार त्यांच्या मनात आलाच नाही” यासोबतच ते म्हणाले की, भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी गोपीचंद पडळकरांना आवरायला हवं.
“आपल्या कुटुंबातही जेव्हा लहान मुलं एखाद्या मोठ्या व्यक्तीला चुकून बोलतात, तेव्हा आई-वडील त्याला सांगतात तू गप, तू लहान आहेस. जेव्हा भाजपाचा एक नेता अशा प्रकारचे विधान करतात तेव्हा त्यांच्यासोबत इतरही आजी-माजी आमदार असतात. त्यावेळी त्यांचे मोठे नेते शांत बसतात. टीका करणाऱ्या लोकांना मोठे नेते सहकार्य करतात, त्यांची पाठराखण करतात”,
“गोपीचंद पडळकर जेव्हा अहिल्यादेवींच्या नावाचा वापर करतात, तेव्हा ते खालच्या दर्जाचं राजकारण करतात. धनगर समाजाच्या युवा वर्गालाही त्या गोष्टी आवडलेल्या नाहीत.