तुम्ही ऐकले आहे की रोबोट कामामुळे निराश होऊन आत्महत्याही करू शकतो? पण असाच एक प्रकार दक्षिण कोरियातून समोर आला आहे. या देशात एका रोबोटने आत्महत्या केल्याचा दावा केला जात असून, मध्य दक्षिण कोरियातील पालिकेकडूनही हा दावा केला जात आहे, त्यामुळे हे गंभीर मानले जात आहे. दक्षिण कोरियातील एका आत्महत्येच्या घटनेने अवघे तंत्रज्ञान विश्व हादरलं आहे. कारण या देशात कुणा मानवाने नव्हे तर चक्क एका रोबोटने आत्महत्या केल्याचं बोललं जातं आहे. विशेष म्हणजे कामाच्या ताणामुळे त्याने आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे.
तुम्ही आतापर्यंत कामाच्या ताणामुळे मानवाने आत्महत्या केल्याच्या अनेक बातम्या ऐकल्या असतील पण रोबोटने आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना आहे. दक्षिण कोरियात एका रोबोटने पायऱ्यांवरून उडी मारून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. हा रोबोट महापालिकेच्या कामात मदत करत होता.
रोबोट गुमी शहरातील रहिवाशांना सुमारे वर्षभर प्रशासकीय कामात मदत करत होता. रोबोट हा सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत काम करीत असल्याची माहिती मिळत आहे. अधिकारी म्हणून नियुक्त झालेला हा पहिला रोबोट होता. रोबोट सुपरवायझरला 2023 मध्ये नियुक्त करण्यात आले होते.