वांद्रे वरळी सी लिंक येथे दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या चार आरोपींना वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. सी लिंकवरील टोल नाक्याच्या कॅबिनमध्ये जमा होणाऱ्या रक्कमेवर हे आरोपी डल्ला मारण्याच्या प्रयत्नात होते. दरम्यान सतर्क असलेल्या वांद्रे पोलिसांनी आरोपींच्या संशयास्पद हालचालीवरून चौघांना ताब्यात घेतले.
पोलिस चौकशीत हे चारही आरोपींना पोलिसांनी हद्दपारची कारवाई करून सुद्धा चोरीच्या उद्देशाने हे मुंबईत आले होते. समीर अन्वर शेख उर्फ मेढा 23 (4 महिने हद्दपार), मोहम्मद अली हजी अली शेख 28 (6 महिने हद्दपार), मोहम्मद हबीब समीर कुरेशी 22 (6 महिने हद्दपार), राज भरत खरे 33 (1 वर्ष हद्दपार) अशी या आरोपींची नावे व त्याच्यावरील कारवाईचा तपशील आहे. वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींवर यापूर्वी पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली होती. मात्र, तरी देखील आरोपी हे चोरीच्या उद्देशनाने मुंबईत आले होते, असं पोलीस तपासात समोर आलं आहे.
दरम्यान, या प्रकरणी अन्य दोन आरोपींचा पोलिस शोध घेत असून अटक चार आरोपींवर पोलिसांनी कलम 399, 402 भादवी सह कलम 425 भाहका सह कलम 37(1),135, 142 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या चारही आरोपींवर पोलिसांनी वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. वांद्रे पोलिसांच्या सतर्कतेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.