अमरावतीमध्ये काल रात्रीच्या सुमारास दोन गटांमध्ये दंगल झाली. अमरावतीच्या अचलपुरात झेंडा लावण्यावरून दोन गटात वाद झाला. त्याचे रुपांतर दगडफेकीत झाले. त्यात पोलिस कर्मचारी जखमी झाले. अचलपूर शहरातील दुल्हा गेटवर झेंडा फडकविल्यामुळे दोन गटात तणाव निर्माण झाल्याने ही घटना घडली आहे.
दरम्यान, ह्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अचलपूर आणि परतवाडा शहरात 144 कलमांतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला असता जमावाने पोलिसांवरही दगडफेक केल्याने हा मुद्दा आणखी उसळला आहे. तर, ह्या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून संपूर्ण अचलपूर शहरात तसेच परतवाडा येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
सध्या तरी दोन्ही शहरांत तणावपूर्ण शांतता आहे.