RBI आजपासून करणार पायलट प्रोजेक्ट सुरु करणार आहे. या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर कोणत्याही अडथळ्याशिवाय कर्ज वितरण सुलभ करायचे आहे. यासाठी आरबीआय आज (17 ऑगस्ट) रोजी प्रायोगिक तत्त्वावर सार्वजनिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म सुरु करणार आहे.
आरबीआयला ज्या ठिकाणी बँका उपलब्ध नाही अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना कर्ज देता येणे सहज शक्य होणार आहे. या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर पायलट प्रकल्पादरम्यान 1.6 लाख रुपयांचे किसान क्रेडिट कार्ड, दूध उत्पादकांना कर्ज, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना कोणत्याही प्रकारचे तारण न देता कर्ज देता येणार आहे.
यामध्ये पहिल्या टप्प्यात कृषी पतपुरवठ्यावर भर असणार आहे.रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबच्या मा्ध्यमातून सहज कर्ज उपलब्ध होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी याबाबतची माहिती दिली.