Admin
ताज्या बातम्या

विशालगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात; खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या इशाऱ्यानंतर जाग

Published by : Siddhi Naringrekar

सतेज औंधकर, कोल्हापूर

ऐतिहासिक विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे. कालच माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांची विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात बैठक झाली होती. महाशिवरात्रीपूर्वी गडावरील सर्व अतिक्रमण काढले जाईल असा आश्वासन जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिलं गेलं होतं. आज सकाळपासून वनविभागाने त्यांच्या हद्दीत असणार अतिक्रमण काढायला सुरुवात केली आहे. खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी दिलेला इशारा नंतर सर्व विभाग खडबडून जागे झाले आहेत. ही मोहीम महाशिवरात्रि पर्यंत सुरू राहणार असून विशाळगड अतिक्रमण मुक्त झाल्याशिवाय थांबणार नाही.

या मागणीनंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य वन व इतर अधिकाऱ्यांनी अतिक्रमणावर तत्काळ कारवाई करण्याची ग्वाही दिली होती.बैठकीच्या दुसऱ्या दिवशी आज जिल्हा प्रशासनाने तात्काळ मोहीम राबवत विशाळगडाच्या पायथ्याला असलेली आणि जुन्या फरसबंदी मार्गावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. गडावरील अतिक्रमणाच्या विरोधात गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने प्रयत्न करणाऱ्या शिवभक्तांच्या प्रयत्नांचे हे यश आहे.

Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल हॅक

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू