जागतिक अर्थव्यवस्थेचा एक तृतीयांश भाग यंदा मंदीच्या सावटाखाली असेल, असा इशारा आयएमएफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी दिला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने मोठा इशारा दिला आहे. 2023 हे 2022 च्या तुलनेने कठीण असणार आहे. या वर्षी 2023 मध्ये जगातील एक तृतीयांश भागाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो असा इशारा आयएमएफने दिला आहे.
कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर अर्थव्यवस्थावर पूर्वपदावर येऊ लागली होती. 40 वर्षांत प्रथमच चीनला मंदीचा सामना कपावा लाणार आहेय अगोदर चीनमध्ये अशी परिस्थिती कधी आली नाही. पुढील काही महिने चिनसाठी कठिण असणार आहे. चिनच्या विकासावर याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. IMF ने जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीन इशारा दिला आहे. चीनला 2023 पासून कठीण प्रसंगाचा सामना करावा लागणार आहे.
"जागतिक अर्थव्यवस्थेचा एक तृतीयांश भाग मंदीत असेल, असा आमचा अंदाज आहे. इतकंच नव्हे तर ज्या देशांमध्ये मंदी नाही, तिथल्याही कोट्यवधी लोकांना मंदी असल्यासारखं वाटेल." झिरो -कोविड पॉलिसीमुळे 2022 मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेची गती कमी झाली आहे. 40 वर्षांत पहिल्यांदाच, 2022 मध्ये चीनची वाढ जागतिक अर्थव्यवस्थेच्या सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या पूर्वी असं कधीच घडलं नव्हतं, असे त्या म्हणाल्या.
तसेच रशिया - युक्रेन युद्ध, वाढते व्याजदार आणि चीनमधील कोरोनाचे संकट या सर्व गोष्टींमुळे जागतिक विकासावर परिणाम होत आहे. रशियानं युक्रेनवर केलेला हल्ला, तेलाच्या वाढत्या किंमती आणि खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. त्या तुलनेत लोकांचं उत्पन्न वाढलेलं नाही. त्यामुळे जगातील सर्व मोठ्या अर्थव्यवस्थेची गती मंदावत आहे. असे देखिल त्यांनी सांगितले.