RBI आज डिजिटल रुपया लाँच करणार आहे. डिजिटल रुपया अर्थात सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) यावर्षी रिझर्व्ह बँक बाजारात आणणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आरबीआयच्या डिजिटल करन्सीबाबत चर्चा सुरु आहे. अखेर 1 नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मोठ्या डीलमध्ये डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. दाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदाच डिजिटल चलनाचा उल्लेख केला होता. "डिजिटल रुपया या आर्थिक वर्षात रोल आऊट केला जाईल", असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं होतं. यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर टी रबी शंकर म्हणाले होते की, "बिटकॉईन सारख्या इतर आभासी चलनांना काढून टाकून हे डिजिटल चलन बाजारात एक उत्तम स्थान निर्माण करेल. आम्ही तुम्हाला सांगतो, केंद्रीय बँक सुरुवातीपासूनच क्रिप्टो आणि बिटकॉइनसारख्या आभासी चलनाला विरोध करत आहे.
तसेच CBDC (Digital Rupee) हे पेमेंटचं एक माध्यम असेल, जे सर्व नागरिक, व्यवसाय, सरकार आणि इतरांना कायदेशीर निविदा म्हणून जारी केलं जाईल. त्याचं मूल्य सुरक्षित स्टोअरच्या कायदेशीर टेंडर नोट (चालू चलन) च्या बरोबरीचे असेल. युजर्स ते सहजपणे बँक मनी आणि कॅशमध्ये रूपांतरित करू शकतील. असे RBI चे म्हणणं आहे.
यासाठी एकूण 9 बँकांची निवड करण्यात आली आहे. डिजिटल रुपीचा वापर प्रथम मोठ्या पेमेंट आणि सेटलमेंटसाठी केला जाईल. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, सरकारी सिक्युरिटीजच्या खरेदी आणि विक्रीवरील सेटलमेंट रक्कम म्हणून डिजिटल रुपी वापरली जाईल. यानंतर महिनाभरात किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्टही सुरू केला जाईल. भारतीय रिझर्व्ह बँकेनं 7 ऑक्टोबर रोजी CBDC (सेंट्रल बँक डिजिटल करन्सी) वर एक कॉन्सेप्ट नोट सादर केली होती. ज्यामध्ये लवकरच डिजिटल रुपी लॉन्च करण्याबाबत उल्लेख करण्यात आला होता. दरम्यान, सध्या केवळ पायलट लॉन्च केलं जात आहे, जे निवडक लोकांसाठी आणलं जाईल. असे त्यांनी सांगितले होते.
RBI नं CBDC-W आणि CBDC-R या दोन श्रेणींमध्ये डिजिटल चलनाची विभागणी केली आहे. CBDC-W हे घाऊक चलन म्हणून वापरलं जाऊ शकते, तर CBDC-R किरकोळ चलन म्हणून वापरलं जाऊ शकतं. सर्व खाजगी, गैर-आर्थिक ग्राहक आणि व्यवसाय ते वापरण्यास सक्षम असतील. आरबीआयच्या मते, डिजिटल चलनामुळे भारताची डिजिटल अर्थव्यवस्था वाढेल. असे अनेक फायदे आपल्याला डिजिटल रुपीचे होतात.