ratan tata health update 
ताज्या बातम्या

Ratan Tata यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरु

मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोमवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. परंतु तेव्हा प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनीच सोशल मीडियाद्वारे सांगितलं होतं. आता पुन्हा त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती येत आहे.

Published by : Team Lokshahi

देशातले ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती येत आहे. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोमवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. परंतु तेव्हा प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनीच सोशल मीडियाद्वारे सांगितलं होतं. आता पुन्हा त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती येत आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या प्रकृतीविषयीची अपडेट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केली होती. या पोस्टमध्ये रतन टाटा यांनी आपल्या प्रकृतीविषयी अपडेट दिली आहे. "माझ्या प्रकृतीविषयी समाज माध्यमांवर अफवा पसरवली जात आहे. मात्र, माझे वय लक्षात घेता. सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही रूटीन वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजीचे काही कारण नाही. कोणीही चुकीची माहिती पसरवू नये." असे या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्याबद्दल सर्व भारतीयांमध्ये एक विशेष स्थान आहे. त्यांना रूग्णालयात दाखल केल्याचे माहिती पडताच सर्वत्र चर्चांना उधाण आले. मात्र, रतन टाटा यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून प्रकृतीची अपडेट मिळाली आहे. त्यांच्याविषयी कोणतीगी अफवा पसरवली जाऊ नये असे आवहन करण्यात आले आहे.

रतन टाटा यांचा थोडक्यात परिचय

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबई झाला. रतन टाटा हे टाटा समुहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू आहेत. रतन टाटा हे उद्योग क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही काम करत आहेत. 1990 ते 2012 पर्यंत 22 वर्षे ते टाटा समुहाचे अध्यक्ष होते. तसेच ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 दरम्यान, त्यांनी टाटा समुहाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला आहे. रतन टाटा यांनी अनेक वर्षे टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून कामकाज पाहिलं आहे. रतन टाटा यांनी केलेल्या सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळे देशभरात ते विशेष लोकप्रिय आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते आपल्या संपत्तीमधील बरचसा हिस्सा दानधर्मासाठी देत आहेत.

IPL Mega Auction 2025 Live: राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू देवदत्त पडिक्कल अन्सोल्डवर!

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव