Admin
ताज्या बातम्या

तेव्हा उद्धव ठाकरे यांची दातखिळी बसली होती का? रावसाहेब दानवेंचा सवाल

Published by : Siddhi Naringrekar

शिंदे - ठाकरे गट एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत असतात. शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014नंतर पीक विम्याचे नियम बदलले. त्यामुळे शेतकरी विमा भरायला लागले. शेतकऱ्यांना विमाही मिळू लागला. सरकार शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करते आहे. कोविड येण्याआधीच मोदींनी सहा महिने आधी तयारी केली होती. लस नव्हती ती तयार केली. असे दानवे म्हणाले.

त्यासोबतच ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे हातवर करून शेतकऱ्यांवर बोलतात. यांना शेती माहीत आहे का? शेतकरी भेटले तरी म्हणायचे माझे कुटुंब माझी जबाबदारी. यांनी अडीच वर्षे काय केले? तर घरात बसले. उद्धव ठाकरे आणि अमित शाह घरात गेले. बंददाराआड चर्चा केली. दोघे अर्ध्या तासात बाहेर आले आणि जाहीर केलं भाजपचाच मुख्यमंत्री होणार. त्यावेळी उद्धव ठाकरे यांची दातखिळी बसली होती का? असा सवाल दानवे यांनी केला. नाव असते पण पक्ष कुणाच्या बापाचा नसतो. असे दानवे म्हणाले.

Israel - Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम? हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार

Chandrashekhar Bawankule : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक भाजप लढणार का?; चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरळ सांगितले...

Bacchu Kadu : 4 नोव्हेंबरला पूर्ण चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात