चंदशेखर बावनकुळे यांच्या भेटीनंतर रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रावसाहेब दानवे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने बहुतेक उमेदवाऱ्या जाहीर केलेल्या आहेत. त्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी दिलेली आहे. मराठवाड्यातल्या काही जागा जाहीर झाल्या आणि काही जागा बाकी आहेत आणि त्या जागेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी याठिकाणी आलो होतो. त्यामुळे मराठवाड्यातील कोणता मोठा नेता कुठे जाणार, काय येणार या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहेत. घटना घडत राहतात.
भाजपाचे विचार आणि अंबादास दानवे यांचे विचार काही वेगळं नाही आहेत. परंतु ते आज आमच्या पक्षात नाहीत आहेत. ते त्यांच्या पक्षाचं काम करतात आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो. त्यांच्याशी आमचा थेट संपर्क झाला नाही. परंतु संभाजीनगरची जागा ही आम्हाला मिळावी किंवा आमच्या मित्रपक्षाला जरी मिळाली तरी ती निवडून यावी यासाठी सगळं प्रयत्न सर्व स्तरावर आम्ही करणार आहे. मला असं वाटतं की धक्का एक नाही धक्क्यांवर धक्के अनेक बसतील. शेवटचा धक्का हा 4 जूनला ठाकरे गटाला बसेल. कुणी आमच्यात आलं म्हणजे आमच्यात आत्मविश्वास गमावला असा त्याचा अर्थ कुणी काढता कामा नये.
आम्हाला पूर्ण विश्वास आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून आम्ही 45 खासदार देणार आहे हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. परंतु जो कोणी येत असेल त्याला घेऊन त्याच्यापेक्षा अजून काही मत आमची वाढू शकत असतील आणि त्याला जर आम्ही घेतल्यामुळे जर कोणी असं म्हणत असेल तुम्हाला आत्मविश्वास नाही. तर ते चुकीचं आहे.