भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावरमहिला पैलवानांनी लैंगिक छळाचे आरोप केले आहे. त्यावरुन आता अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. ब्रिजभूषण सिंग विरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर आता रामदेव बाबा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रामदेव बाबा म्हणाले की, कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांवर लैंगिक छळाचा आरोप करणे अत्यंत लज्जास्पद आहे. अशा व्यक्तींना तात्काळ अटक करून तुरुंगात पाठवावे. असे रामदेव बाबा म्हणाले.