महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत शिंदे-फडणवीस सरकारवर अजित पवार यांनी जोरदार टीका केली होती. याचे प्रतिउत्तर देत रामदास कदम यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
रामदास कदम म्हणाले की, दुसऱ्याकडे एक बोट केले तर चार बोटे आपल्याकडे असतात याचे भान अजित पवार यांनी ठेवावे. अजित पवार यांच्यामुळेच शिवसेनेचे आमदार फुटले. राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी वाटप करून अजित पवार यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली. 'उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेले तर अजितदादांचे उपमुख्यमंत्रीपद गेले. त्यामुळेच थयथयाट सुरू आहे. असे रामदास कदम म्हणाले.