22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या नव्या मंदिरात रामलल्लांचा प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडला. यातच आता पहिल्याच पावसात पाण्याची गळती होत असल्याची माहिती मिळत आहे. अयोध्याचे श्रीराम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी याची माहिती दिली आहे. यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, कोट्यवधी लोकांच्या श्रद्धास्थानाऐवजी सगळा फोकस स्वतःवर घेणं असो की लोकांची भावना व श्रद्धा राजकीय बाजारात खरेदी करण्याचा प्रयत्न असो, हे जनता जनार्दनालाही पटत नसल्याचं लोकसभा निवडणुकीत अयोध्येतील भाजपच्या पराभवाने सिद्ध झालं.
यासोबतच ते म्हणाले की, अयोध्येतील मंदिराचं बांधकाम अर्धवट असूनही केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने घाईघाईत केलेली प्राणप्रतिष्ठा आणि आता मंदिराचं गळत असलेलं छत बघितलं तर हा एक संदेशच आहे आणि तो लोकांना समाजतो तसा भाजपलाही कळेल, ही अपेक्षा! जात आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असल्याने यावर राजकीय पोळी भाजण्यापेक्षा सरकारने मुद्द्यांवर बोलावं. लोकांच्या हाताला काम आणि पोटाला भाकरी हे विषय अधिक महत्त्वाचे आहेत. ही बाब सर्वक्षीय नेत्यांनी लक्षात घ्यावी. असे रोहित पवार म्हणाले.