ताज्या बातम्या

Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील राम मंदिराचा मुख्य दरवाजा उघडला

अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. आज होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येसह संपूर्ण देशभर रामभक्तीचे वातावरण आहे. अयोध्येतील घराघरांवर भगवे ध्वज उभारण्यात आले आहेत. सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता अयोध्येतील राम मंदिराचा मुख्य दरवाजा उघडण्यात आला आहे. सकाळी 10.55 वा. पंतप्रधानांचे राम जन्मभूमी परिसरात आगमन होईल. दुपारी 12.15 ते 12.45 वाजेपर्यंत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. प्राणप्रतिष्ठेचा शुभमूहूर्त 12.29.08 ते 12.30.32 आहे.

मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. निमंत्रित पाहुण्यांची मंदिरात येण्यासाठी सुरुवात झाली आहे. राममंदिर सोहळ्यासाठी अयोध्येत कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यासाठी 10 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह ड्रोनची नजर असणार आहे.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार

ऐरोलीत गणेश नाईक वि. ठाकरेंच्या शिवसेनेचे मनोहर मढवी

PM Modi Speech | 'Rahul Gandhi यांच्या तोंडातून हिंदूहृदयसम्राट वदवून दाखवा', मोदींचा टोला

NEWS PLANET With Vishal Patil |नारा एक, भूमिका अनेक; 'बटेंगे तो कटेंगे'वरून पंकजा मुंडेंचा घरचा आहेर

Rajesaheb Deshmukh Parli Assembly election 2024 : परळीत हाय व्होल्टेज सामना! राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे