सुरज दहाट, अमरावती
भारतीय स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा" साजरा करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्यात. या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकाकडून प्रांगणात पायदळ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात महानगरपालिकेच्या प्रांगणातून गांधी चौक, जवाहर गेट, जयस्तंभ चौक ते राजकमल चौक अशी करण्यात आली या दरम्यान रॅलीमध्ये जनजागृतीसाठी पथनाट्य देखील करण्यात आले. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर झेंडा लावावा. राष्ट्रप्रेम जागृत व्हावेत यासाठी हा संपूर्ण उपक्रम देशात देखील राबवल्या जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर आपल्या मधील असलेले राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम या अभियानांतर्गत केले जाणार आहेत. जास्तीत जास्त घरांवर तिरंगा फडकविला जाणे, ही अभिमानास्पद बाब आहे, असे संदेश या रॅलीच्या पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला. एकमेकांमध्ये राष्ट्रीयत आणि एकात्मता वाढावी या हेतूने केंद्र शासनामार्फत हर घर तरंगा अभियान राबविले जात आहे.
भारतीय स्वतंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आठवणी उजाळून निघाव्यात तसेच स्वातंत्र्यलढाणाच्या स्मृती ठेवून राहाव्यात, यासाठी तिरंगा मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.