Aman Chopra Team Lokshahi
ताज्या बातम्या

Aman Chopra या प्रसिद्ध न्यूज अँकरला अटक होणार; राजस्थान पोलीस नॉएडामध्ये दाखल

अमन चोप्रांच्या अटकेवरुन राजस्थान आणि उत्तर प्रदेश पोलीस आमने सामने आले आहेत.

Published by : Sudhir Kakde

दिल्ली : राजस्थान पोलिसांचं एक पथक उत्तर प्रदेशातील नॉएडा येथे टीव्ही पत्रकार अमन चोप्राला अटक करण्यासाठी दाखल झालं आहे. दोन सुमदायांमध्ये शत्रुत्व वाढवण्याच्या आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अमन चोप्रा यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघालं आहे. (Rajasthan Police to Arrest Aman Chopra)

डुंगरपूर कोतवाली पोलीस स्टेशनच्या म्हणण्यानुसार, एका व्यक्तीने श्री चोप्रा यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला होता. या व्यक्तीने आरोप केला होता की पत्रकार अमन चोप्रा यांनी आपल्या एका कार्यक्रमात खोटे आणि काल्पनिक तपशील दिले आणि चिथावणीखोर वक्तव्य केलं. जहांगीरपुरीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर बदला म्हणून अलवर जिल्ह्यातील राजगढमधील मंदिर पाडण्याचं काम राजस्थान सरकारने केलं असा दावा अमन चोप्रांनी केला आहे.

अमन चोप्रा यांच्या विरोधात 23 एप्रिल रोजी बुंदी, अलवर आणि डुंगरपूर जिल्ह्यांमध्ये देशद्रोह, धार्मिक भावना भडकावणे, दोन गटांमधील वैर वाढवणे आणि आयटी कायद्यांतर्गत विविध कलमांतर्गत तीन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. यापैकी बुंदी आणि अलवर जिल्ह्यात दोन प्रकरणांमध्ये त्यांना राजस्थान उच्च न्यायालयाकडून अटकेसाठी स्थगिती मिळाली. परंतु डुंगरपूर जिल्ह्यातील स्थानिक न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यास परवानगी दिली असं पोलिसांनी सांगितले.

"आमची टीम नॉएडामध्ये तळ ठोकून आहे. अमन चोप्रांचा शोध घेण्यासाठी सर्व संभाव्य ठिकाणांचा शोध घेतला जातोय. काल देखील आमची टीम चोप्राच्या घरी गेली होती. मात्र तिथे ते सापडले नाहीत. त्यांच्या निवासस्थानाला कुलूप लावण्यात आलं होतं," अशी माहिती डुंगरपूरचे एसपी सुधीर जोशी यांनी माध्यांना दिली.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result