Raj Thackeray, Ajit Pawar Team Lokshahi
ताज्या बातम्या

'अजित पवार स्वत:च्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत', 'खुपते तिथे गुप्ते’ मधून राज ठाकरेंचा खुपता वार

छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या बहुचर्चित शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल १० वर्षांनंतर हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला

Published by : shweta walge

छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या बहुचर्चित शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल १० वर्षांनंतर हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये कलाकारांसह राजकीय नेतेही हजेरी लावणार आहेत. या शोच्या दुसऱ्या सीझनमधील एक नवा प्रोमो व्हिडीओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

झी मराठीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’च्या या प्रोमो व्हिडीओमध्ये राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवारांवर जोरदार फटाकेबाजी करताना दिसत आहेत.

अवधूत या कार्यक्रमात अजित दादांची एक क्लिप दाखवतो. त्यात ते म्हणतायत, 'एकदा निवडणुकीतून बाहेर पडलो होतो तर त्यांचे १४ आमदार निवडून आणले. ते सगळे आमदार त्यांच्यापासून दूर झाले होते.' त्यावर उत्तर देताना राज म्हणतात, 'मी आता बोलणार होतो. ए गप रे. अजित पवार स्वतःच्या मुलाला नाही निवडून आणू शकले. बारामतीमधून जर त्यांच्या काकांनी हात बाजूला केला तर यांचं तरी काय होईल?' अशा शब्दात राज यांनी त्यांच्या व्हिडिओला प्रत्युत्तर देत अजित दादांवर सडकून टीका केली आहे.

राज यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा प्रोमो पाहून आता प्रेक्षकांमध्ये राज यांचा 'खुपते तिथे गुप्ते' चा पूर्ण एपिसोड पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वाजता हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी होणार आहेत.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Ajit Pawar : रोहित पवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा म्हणाले...

अजित पवार यांच्या पाया पडल्यानंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Latest Marathi News Updates live: नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड