ताज्या बातम्या

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची निवड करणार राज ठाकरे

Published by : Dhanshree Shintre

दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची निवड राज ठाकरे करणार आहेत. दिल्लीत 70 वर्षांनी होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मान सरहद संस्थेला मिळाला आहे.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात नियोजित या साहित्य संमेलनासाठी सरहद संस्थेच्या वतीने बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातून शंभरहून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला.

त्यातून संमेलनासाठी वापरण्यात येणाऱ्या बोधचिन्हाची निवड मनसेचे राज ठाकरे करणार असून त्यांच्याच हस्ते बोधचिन्हाचे अनावरण करण्यात येणार आहे. यापूर्वी 1954 मध्ये दिल्ली येथे मराठी साहित्य संमेलन झाले होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.

Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र; पत्रात काय?

कोलकाता येथील डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरण; 41 दिवसांनी डॉक्टरांचा संप मागे

Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ; मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना

वडीगोद्रीतून अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता केला खुला

Akola : अकोला कृषी विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन