ताज्या बातम्या

जो प्रकल्प येतो तो गुजरातलाच कसा जातो? राज ठाकरेंचा सवाल

महाराष्ट्रातील दोन मोठं प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर राजकीय वर्तुळात वातावरण चांगलेच तापले आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

महाराष्ट्रातील दोन मोठं प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर राजकीय वर्तुळात वातावरण चांगलेच तापले आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काही दिवसांआधी टाटा एअरबस हा प्रकल्प नागपुरातून गुजरातला गेला.त्यानंतर कालही आणखी एक प्रकल्प नागपुरातून राज्याबाहेर गेलाय. सॅफ्रन ग्रुपचा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. नागपूरच्या मिहानमध्ये हा प्रकल्प होणार होता पण आता हा प्रकल्प हैदराबादला गेला असल्याची माहिती आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले की, “प्रकल्प बाहेर गेला म्हणजे कुठे गेला, गुजरातमध्ये गेला. माझी मागची सर्व भाषणे तुम्ही जर काढून बघितली तर पहिल्यापासून माझं मत हे असंच होतं की, पंतप्रधान हे देशाचे आहेत आणि त्यांच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान असलं पाहिजे. उद्या जर महराष्ट्रातील हा प्रकल्प बाहेर गेला असता असं समजा की आसामला गेला असता तर मला वाईट नसतं वाटलं. परंतु वाईट या गोष्टीचं वाटतय की जो प्रकल्प येतोय आणि बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय.”

यासोबतच “सध्याचं जे राजकारण सुरू आहे ते अत्यंत खालच्या पातळीवरचं आहे. जे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, जी भाषा वापरली जात आहे तीही इतक्या खालच्या स्तराची भाषा आहे, की असं राजकारण मी या अगोदर कधी पाहिलेलं नव्हतं. दुर्दैवं दुसरं काय बोलणार.” तसेच “मला असं वाटतं पंतप्रधानांनी स्वत: याकडे लक्ष देणं गरेजंच आहे, की प्रत्येक गोष्ट ही जर गुजरातला जात असेल तर मग राज ठाकरे ज्यावेळी महाराष्ट्राबद्दल बोलतो त्यावेळी त्याला संकुचित म्हणण्यासारखं काय आहे?. मला वाटतं पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे आणि तो सगळ्या देशाचा असला पाहिजे. प्रत्येक राज्य मोठं झालं पाहिजे प्रत्येक राज्यात उद्योगधंदे आले पाहिजेत. तिकडच्या लोकांना तिथून आपलं घर सोडून बाहेर जायची आणि दुसऱ्या राज्यावर ओझं बनण्याची आवश्यकता नाही. असे प्रकल्प जर समजा प्रत्येक राज्यांमध्ये गेले तर देशाचाच विकास होईल.” असं राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी