ताज्या बातम्या

मंत्रालयात टोलसंदर्भात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार; राज ठाकरेंच्या बैठकीत मोठे निर्णय

टोलनाक्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यानंतर काल राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

Published by : shweta walge

टोलनाक्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यानंतर काल राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पण या भेटीत काही निर्णायक तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज पुन्हा या मुद्द्यावर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली.

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे यांच्यासोबत बैठक झाली. त्यात काही गोष्टी ठरल्या पण लेखी स्वरूपात आल्या नव्हत्या. नंतर मग आज ही बैठक झाली ज्यामध्ये लेखी स्वरूपात काही गोष्टी आल्या आहेत. 9 वर्षानंतर मी सहयाद्रीवर गेलो, त्याच वेळी कळलं होतं की टोल संदर्भातील ऍग्रिमेंट 2026 पर्यत संपणार होते हे मला माहित आहे, 2026 पर्यत ऍग्रिमेंट बँकेसोबत झाल्याने त्यात आता काही करता येत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

ठाण्यातील 5 एन्ट्री पॉईंट्सवर टोल वाढविण्यात आले, अविनाश जाधव यांनी आंदोलन केलं, त्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वक्तव्य केले की चारचाकी आणि तीन चाकी वाहनांना टोल नाही असे ते म्हणाले. लोकांना वाटलं की आम्हला फसवलं जाताय की काय? टोल घेणार असाल तर तुम्ही कोणत्या सोयीसुविधा दिल्या गेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी झालेली नाही, पुढचे 15 दिवस या सर्व एन्ट्री पॉईंट्स वर सरकार आणि आमच्या पक्षाचे कॅमेरे लावले जातील आणि किती गाड्या या टोल वरून जातात हे कळेल ही व्हिडिओग्राफी उद्या पासून सुरू होईल, असंही राज ठाकरे म्हणाले.

तर टोल नाक्यावर कोणकोणत्या सुधारणा व्हाव्यात यावर आमच्यात चर्चा झाली. टोल घेणार असाल तर तुम्ही काही सुविधा देणार हे ॲग्रीमेंटमध्ये काही गोष्टी असतात त्यांची अंमलबजावणी झाली नाही असंही राज ठाकरे म्हणाले आहेत

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी