ताज्या बातम्या

लाडकी बहीण म्हणता...मग लाडके भाऊ काय मेले काय?; राज ठाकरेंचा सरकारला सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची लातूर येथून सरकारवर टीका, महागाई आणि मूलभूत सुविधांवरील सरकारच्या धोरणांचा निषेध.

Published by : shweta walge

थोडक्यात

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लातूर येथून विधानसभा प्रचाराचा नारळ फोडला.

  • सभेत राज ठाकरे यांनी मूलभूत सुविधांवर भाष्य करत सरकारवर टीका केली, आणि महागाईसंबंधी सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

  • राज ठाकरे यांनी सरकारवर आरोप केला की, "लाडक्या बहिणीला पैसे देण्याचे, महागाई वाढवण्याचे आणि नंतर ते पैसे काढून घेण्याचे" काम सरकार करत आहे.

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लातूर येथून विधानसभा प्रचाराचा नारळ फोडला. या सभेमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी मूलभूत सुविधांवर भाष्य केलं तसच सरकारवर देखील टीका केली आहे. लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे महागाई वाढवायची आणि दिलेले पैसे काढून घ्यायचे असा आरोप राज ठाकरे यांनी सरकारवर लावला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

मी 10 मिनिटांसाठी आलोय. तुमचं दर्शन घेण्यासाठी आलोय. माझ्या उमेदवारांना आशीर्वाद मागण्यासाठी आलोय. निवडणुकीत आशीर्वाद म्हणजे मत.

मंगळवेढ्याची ओळख दुष्काळग्रस्त तालुका. किती निवडणुका झाल्या तरी मंगळवेढा दुष्काळग्रस्तच. इतकी वर्ष झालं मंगळवेढा दुष्काळग्रस्त असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्यांना आजपर्यंत निवडून दिल त्यांना समोर आल्यानंतर विचारा की आमचा तालुका अजून दुष्काळग्रस्त कसा. पण हे विचारण्याचे कुणाची हिंमत नाही. निवडून आलेल्या लोकांना प्रश्न विचारा.

लातूरमध्ये बोर्ड लागतो पुण्यामध्ये घर हवा आहे का? याचा अर्थ आपले तरुण-तरुणी गाव सोडून पुण्याकडे विस्थापित होत आहेत. गावात उद्योग धंदा हाताला काम नसल्याने विस्थापितांची संख्या वाढली. तुम्ही ज्या गावात असाल त्या ठिकाणी मी तुम्हाला रोजगार आणून देतो ही माझी हमी आहे. गेली अनेक वर्ष तुम्ही आहेत काय पण मी पहिल्यांदाच बोलतोय. तुम्हाला तुमचे गाव तालुका सोडायची गरज नाही, गावात तालुक्यात उद्योग उभा करणे सोपं आहे.

एका बाजूला शेतकरी आत्महत्या करतोय, मराठवाड्यामध्ये महिला तरुणी पळवल्या जात आहेत.राज्यात महिला अत्याचारांची संख्या वाढली आहे. एकदा राज ठाकरे च्या हातात सत्ता द्या. सगळ्यांना वठणीवर आणतो.

तुम्ही निवडून देता त्यांना काही काम करण्याची इच्छा नाही. मी जगामध्ये फिरलेला माणूस आहे जग कुठल्या कुठे गेलं आपण इथेच आहोत. 60 70 वर्षानंतर देखील पाणी आणि रोजगाराच्या पुढे निवडणुका सरकल्या नाहीत. महिला सुरक्षित असायलाच पाहिजेत तुम्ही महिलांना सुरक्षा देणारे कोण?

1990 पासून मी राजकारणामध्ये आहे.आलटून पालटून सर्वांच्या सत्ता आल्या पण विषय नवीन आले नाहीत. पाणी रोजगाराच्या पुढे निवडणुकांमध्ये कुठलाच विषय नाही. तेच तेच ऐकून तुम्हाला कंटाळा आला नाही का ?

2014 ला महाराष्ट्राचा आराखडा तयार केला. राज्यातील समस्यांवर उत्तर काय हे 2014 मध्ये आम्ही तयार केलं होतं. 1947 नंतर फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्याचा विकास आराखडा जनतेसमोर ठेवला. फक्त तुमच्या समोर पैसे फेकले, आणि मतदानाच्या रांगेत उभे केले. प्रस्थापित पक्ष सोडून वेगळा पर्याय निवडा. चार औषधांनी आजार बरा झाला नाही आता पाचवा औषध निवडा.

लाडकी बहीण आहे तर लाडके भाऊ मेले का? ह्या असल्या लोकांच्या नादी लागू नका. एकदा राज ठाकरे आणि आमच्या सहकाऱ्यांना संधी देऊन बघा. इतक्या वर्षाचे प्रश्न पाच वर्षात सुटतील असे नाही मात्र प्राधान्याने आम्ही प्रश्न सोडवू अस ते म्हणाले.

आम्ही रेल्वे नोकर भरतीवरून आंदोलन केलं होतं. महाराष्ट्रातील रेल्वे मधील नोकऱ्यांचा आम्हाला पत्ता लागत नाही. राज्यातील रेल्वे स्टेशन उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांनी तुडुंब भरलेली असतात. रेल्वे मधील नोकऱ्यांसाठी उत्तर प्रदेश बिहारी येत असतील तर हे आम्हाला का माहिती नव्हते. त्यावेळी उत्तर प्रदेश आणि बिहार मधील वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिल्या महाराष्ट्रातील एकही वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात दिली नव्हती. राज्यातील तरुण-तरुणांना नोकरी मिळू नये यासाठी हे सगळं सुरू होतं. आपली लोक चौकशी करायला गेल्यानंतर त्यांना आई बहिणी वरून शिव्या देण्यात आल्या. आमच्या आई बहिण काढणार तर आम्ही त्यांच्या गालावर टाळ्या वाजवा. या आंदोलनानंतर मराठी वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येऊ लागल्या आणि परीक्षा देखील मराठीमध्ये होऊ लागली. सत्ता नसताना देखील राज ठाकरे तुम्हाला नोकऱ्या देतो, सत्ता आल्यावर तुमच्यासाठी काय काय करू शकतो विचार करा अस ते म्हणाले.

MVA Manifesto : 'लाडकी बहीण'ला 'महालक्ष्मी'ची टक्कर,'मविआ'च्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस

Latest Marathi News Updates live: महायुतीच्या 'लाडकी बहीण' योजनेला टक्कर, मविआकडून महिलांना 3 हजार

Rahul Gandhi MVA Manifesto Mahalaxmi Yojana : महायुतीच्या 'लाडकी बहीण' योजनेला टक्कर, मविआकडून महिलांना 3 हजार

Vidhan Sabha Election | Shrirampur मध्ये काँग्रेसला मोठं खिंडार! उपनगराध्यक्ष, नगरसेवक NCPत

'संविधान सिर्फ बहाना है लाल पुस्तक को...' भाजपकडून व्हिडिओ ट्विट करत दावा