राज ठाकरे व त्यांच्या मनसे पक्षाने मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाबद्दल काहीशी मौनाची भुमिका घेतलेली पाहायला मिळाली. औरंगाबादमधील सभेमध्ये राज ठाकरेंनी भोंग्याविरोधात घेतलेल्या भुमिकेनंतर राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रियेमुळे ते राजकारणात तितकेसे सक्रीय दिसले नाहीत. मात्र, यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे.
काल पार पडली मनसे नेत्यांची बैठक:
काल राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये राज यांच्या आगामी विदर्भ दौऱ्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. तसंच आगामी निवडणूकांमध्ये मनसेची रणनीती काय असावी यासंदर्भातही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, बैठकीला सुरूवात होण्यापुर्वी राज यांनी पत्रकारांशी 'ऑफ द रेकॉर्ड' संवादही साधला तेव्हा राज ठाकरेंनी मनसेमध्ये इनकमींग होणार असल्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे
राज यांनी पुन्हा बोलवली बैठक:
येत्या 17 सप्टेंबरपासुन राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापुर्वी 16 तारखेला राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मनसे नेत्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये राज विविध मुद्द्यांवर चर्चा करू शकतात. ही बैठक राज यांच्या दौऱ्याच्या आदल्या दिवशी होणार असल्याने या बैठकीचं महत्त्व वाढलं आहे.
कोणत्या संभाव्य मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा?
राज यांच्या विदर्भ दौऱ्या दरम्यानच्या कार्यक्रमांची रुपरेषा ठरवणं
आगामी निवडणूकांसाठी मनसे पक्षाची रणनीती पक्की करणं
राज यांनी काल पत्रकारांशी बोलताना मनसेमधील इनकमींगसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे मनसेमध्ये होणार असलेल्या इनकमिंग संदर्भात चर्चा होण्याची शक्यता