राज्यात आता जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पाऊस गायब झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.गेल्या दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे.
या पावसाचा फटका मुंबईच्या लोकल सेवेलाही बसला आहे. पनवेल ते बेलापूर दरम्यान वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. तर अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे वाहतूक देखील बंद आहे. पावसाचे पाणी रुळावर आल्याने वाहतूक बंद झाली आहे.
चाकरमान्यांना कामावर जाताना समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही स्थानकात रेल्वे मार्गावरील ट्रेन सुरु आहेत. पावसामुळे मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रेन आता उशिरानं धावत आहेत. लोकलचं वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.