ताज्या बातम्या

Pune Sinhgad: पुण्यात पावसाचा हाहाकार! सिंहगड रोड येथील नागरिकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरु

Published by : Dhanshree Shintre

सिंहगड परिसरात कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिंहगड परिसरातील ओढे नाले तुडुंब पाण्याने भरून वाहू लागले आहेत. आज सकाळी गोळेवाडी ते आतकरवाडी सिंहगड पायथा रस्त्यावरील पुल पाण्याखाली गेला. आतकरवाडी घेरा सिंहगडमधील रहिवासी नागरिकांचा आणि पर्यटकांचा देखील काही काळ संपर्क तुटला होता. काही पर्यटक अडकून पडले होते.

सिंहगड रोड येथील एकता सोसायटी आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यानंतर मुठा नदीच्या पात्रातलं पाणी सोसायट्यांमध्ये शिरला आहे. गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. नागरिकांना रेस्क्यू करण्याचं काम अग्निशामक दलाकडून केलं जात आहे. अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत.

पुण्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. पालिकेचे दीडशे कर्मचारी सध्या रेस्क्यू करत आहेत. सिंहगड रोडवरील ज्या ज्या सोसायटीत पाणी साचलंय तिथे शेकडो नागरिक अडकले आहेत. पाटबंधारे विभागाकडून पूर्व सूचना दिली नसल्याने पाण्याचा प्रवाह वाढल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा