विविध तांत्रिक कामांसाठी आज (रविवार) मध्य रेल्वेच्या (central railway) मुख्य मार्गावरील ठाणे-कल्याण, सीएसएमटी-चुनाभट्टी,वांद्रे हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-मुंबई सेन्ट्रल स्थानकादरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर मेगाब्लॉक आहे. त्यामुळे लोकल फेऱ्या विलंबाने धावतील. हार्बरवरील लोकल (mumbai local) फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून फक्त विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे-
कुठे - ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप -डाऊन जलद मार्गावर
कधी - सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत
परिणाम - सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध जलद लोकल सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यानच्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मात्र १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील; तर कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर थांबवल्या जातील. पुढे मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.
हार्बर रेल्वे -
कुठे - सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे स्थानकादरम्यान अप-डाऊन मार्गावर
कधी - सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम - सीएसएमटी येथून वाशी/बेलापूर/पनवेल/वांद्रे/गोरेगाव करिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द. तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द. या ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा.
पश्चिम रेल्वे -
कुठे - चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन धीम्या मार्गावर
कधी - सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
परिणाम- या ब्लॉकदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांदरम्यान अप- डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच डाऊन दिशेच्या काही गाड्या रद्द.