माटुंग्याजवळ दोन रेल्वे आमने सामने आल्याची घटना घडली आहे. दादरच्या (Dadar) प्लॅट फॉर्म क्रमांक सातवर ही घटना घडली आहे. दोन रेल्वेची क्रॉसींग होत असताना हा अपघात घडला आहे.
गदग एक्सप्रेस आणि पॉंडीचेरी एक्सप्रेस समोरा-समोर आल्याने प्रवाशांमध्ये हा अपघात झाला. दोन्ही गाड्या एकमेकांवर आदळता आदळता थोडक्यात बचावल्या. त्यामुळे हजारो प्रवाशांचा जीव वाचला.
मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर हा सर्व प्रकार घडला आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर गदग एक्सप्रेस- पाँडेचरी एक्सप्रेस आमनेसामने आल्या आहेत. या अपघातात एक्सप्रेस गाडीचे 3 डब्बे घसरले आहेत.
११००५ या रेल्वेची गदग एक्सप्रेसला धडक दिल्याने काही डबे रुळावरुन घसरल्याची माहिती रेल्वेचे माहिती व संपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.डाऊन फास्ट आणि अप फास्ट मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच धिम्या मार्गावरील गाड्यांचा विद्युत पुरवठा हा सुरक्षेच्या दृष्टीने खंडीत केला होता.
डाऊन फास्ट आणि अप फास्ट मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच धिम्या मार्गावरील गाड्यांचा विद्युत पुरवठा हा सुरक्षेच्या दृष्टीने खंडीत केला होता.
या प्रकारच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.