Raigad Kumbhe Waterfall Update Lokshahi
ताज्या बातम्या

नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई; रिल स्टार अन्वी कामदारच्या मृत्यूनंतर रायगड पोलिसांनी दिल्या सूचना

रायगडच्या माणगाव येथील कुंभे धबधब्यावर मुंबईची सोशल मीडिया स्टार अन्वी कामगार या तरुणीचा काल बुधवारी मृत्यू झाला.

Published by : Naresh Shende

Raigad Kumbhe Waterfall : रायगडच्या माणगाव येथील कुंभे धबधब्यावर मुंबईची सोशल मीडिया स्टार अन्वी कामदार या तरुणीचा काल बुधवारी मृत्यू झाला. रिल काढताना ३००-३५० फूट खोल दरीत पडल्याने अन्वीचा दुर्देवी मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर रायगड पोलीस अधिक सतर्क झाले असून पोलिसांकडून पर्यटकांसाठी प्रतिंबधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

कुंभे धबधब्यावर अन्वीचा मृत्यू झाल्यानंतर रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी माध्यमांशी संवाद साधत नागरिकांना आवाहन केलं आहे. रायगडच्या माणगाव येथील कुंभे धबधब्यावर अन्वी कामदार या तरुणीचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात अनेक धबधबे, नद्या ओसंडून वाहत आहेत. या ठिकाणी तरुण मुलं आणि ट्रेकर्स साहसी स्टंट करण्याच्या नादात असतात. त्यामुळे काही अनर्थ घटना घडतात. त्यासाठी रायगड पोलिसांच्या वतीनं प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. याचं सर्वांनी पालन करावं, अशी विनंती करण्यात येत आहे. याचं उल्लंघन केलं, तर कठोर कारवाई करण्यात येईल, याची आपण दखल घ्यावी, अशी प्रतिक्रिया रायगड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

पावसाळी हंगाम सुरु झाल्यापासून अनेकांना धबधब्यावर पोहण्याचं वेड लागलं आहे. जीवाची पर्वा न करता डोंगर कपाऱ्यांमध्ये रिल्स आणि सेल्फी काढून काही पर्यटक आपला जीव धोक्यात घालतात. अशाच प्रकारची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील माणगावच्या कुंभे धबधब्यावर घडली . रिल बनवण्याच्या नादात अन्वीला जीव गमवावा लागला.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती