Raigad Bhairavnath Yatra Festival 
ताज्या बातम्या

Raigad Bhairavnath Yatra Festival : भैरवनाथ यात्रा उत्सव उत्साहात

कर्जतरायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे भैरवनाथाची आगळीवेगळी यात्रा उत्साहात साजरी झाली...

Published by : Pankaj Prabhakar Rane

रायगड : भारत गोरेगावकर | रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे भैरवनाथाची आगळीवेगळी यात्रा उत्साहात साजरी झाली. गावापासून सात ते आठ किलोमीटर दूरच्या जंगलात जाऊन गावकरी चाळीस फूट लांब देवाची लाट खांद्यावर घेऊन पायी गावात येतात आणि मग ही लाट मानकरी उंच बगाडावर फिरवितात. या उत्सवासाठी राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी होते. या उत्सवासाठी भक्तिभावाने पिरबाबा दर्ग्यातील पिराला मानाने बोलावले जात असल्याने 'सर्वधर्म समभावाचा उत्सव' अशीही याची महती आहे.

जंगल भागात मोठ्या भक्तिभावाने ज्या लाकडाची पूजा केली जाते, याच लाकडाला काळभैरव देवाची लाट असे म्हटले जाते. गोरेगांवपासून पूर्वेकडे असणाऱ्या जंगल भागात या लाटेची निवड केली जाते. जी चाळीस फूट लांबीची असते. सर्व गावकरी एक रात्र आधी जंगलात वस्तीसाठी येतात आणि दुसऱ्या दिवशी पूजाअर्चा करून नैवेद्य दाखवून रानातच महाप्रसाद करून पायी चालत खांद्यावरून देवाची लाट गावात आणतात. यामध्ये सर्व जातीधर्मांतील लोकांचा समावेश असल्याने सामाजिक सलोख्याचे वातावरण पहायला मिळते. विशेष म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजच्या तरुणपिढीनेही जपली आहे.

गावकऱ्यांनी जंगलातून आणलेल्या देवाच्या लाटेची ठिकठिकाणी भक्तीभावाने पूजा केली जाते. अनेक नवस बोलले आणि फेडले जातात. या नंतर दुसऱ्या दिवशी काळभैरव मंदिरासमोरील उंच बगाडावर वतनदार मंडळींकडून ही लाट चढवली जाते व मानकऱ्यांमार्फत ती फिरवली जाते. हे क्षण पहाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. मंदिराशेजारील टेकडीवरती असणाऱ्या पिरबाबा दर्ग्यातील पिराला पालखी घेऊन मानाने हाक मारून बोलावले जाते. यानंतरच देवाची लाट फिरते.

आजची तरुणाईसुद्धा या उत्सवासाठी आवर्जून उपस्थित राहून 'चल भैरी हर हर महादेव'चा गजर करत असते. अनेक मानाच्या पालख्या आणि उंच देव काठ्या यावेळी नाचविल्या जातात. सोनेरी मुखवटा चढवलेल्या काळभैरव देवाचे रूप ही तितकेच साजिरे गोजिरे दिसत असते, असे अनेक वतनदार ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण