ताज्या बातम्या

फडणवीसांवर राहुल गांधींचा जोरदार पलटवार; ट्विट करत म्हणाले की...

राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार पलटवार केला, संविधान आणि जात निहाय जनगणनेसाठी आवाज उठवणे नक्षलवादी कल्पना असल्याचा फडणवीसांचा आरोप.

Published by : shweta walge

थोडक्यात

  1. राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीसांवर पलटवार करत भाजपच्या विचारसरणीला डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या राज्यघटनेचा अपमान म्हणून वर्णन केले.

  2. देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरातील सभेत "लाल संविधान" किंवा "लाल पुस्तक" दाखवून अराजकता पसरवण्याचा आरोप केला.

  3. फडणवीस यांनी भारत जोडो मोहीम आणि अर्बन नक्षलवाद यांच्याशी संबंधित अराजकतेचा आरोप केला.

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कॉंग्रेस नेते राहुल गांधीनी जोरदार पलटवार केला आहे. भाजपची ही विचारसरणी म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यघटनेचे निर्माते डॉ.भीमराव आंबेडकर यांचा अपमान आहे, अस राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटंल आहे. दरम्यान कोल्हापूरातील सभेत देवेंद्र फडणवीस यांनी लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहेत? तुम्ही या माध्यमातून अराजकता पसरवत आहात. भारत जोडोच्या माध्यमातून अराजकता पसरवली जात आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही, असा आरोप लावला होता.

राहुल गांधी यांचं ट्विट

फडणवीसांच्या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान दाखवणे आणि जात निहाय जनगननेसाठी आवाज उठवणे ही नक्षलवादी कल्पना आहे! भाजपची ही विचारसरणी म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यघटनेचे निर्माते डॉ.भीमराव आंबेडकर यांचा अपमान आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने संविधानासाठी लढून महाविकास आघाडीला मोठा विजय मिळवून दिला.

महाराष्ट्रातील जनता भाजपकडून बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही - ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीशी हातमिळवणी करतील आणि आपल्या संविधानावरील प्रत्येक हल्ल्याला पूर्ण ताकदीने उत्तर देऊन त्याचे रक्षण करतील. आणि, भाजपचे असे सर्व लाजिरवाणे प्रयत्न अयशस्वी होतील - ते लेखी मिळवा, जात जनगणना होईल.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणीवस?

भारत जोडा असा समूह करण्यात आला आहे ज्यामध्ये अनेक संघटना सामील झाल्या आहेत. ज्या संघटना अतिशय डाव्या विचाराच्या आहेत. त्यांची ध्येयधोरणे पाहता ती अराजकता पसरवणारी यंत्रणा आहे. राहुल गांधी एक पुस्तक दाखवतात. संविधानाचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे, मग लाल संविधान कशासाठी? लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहेत? तुम्ही या माध्यमातून अराजकता पसरवत आहात. भारत जोडोच्या माध्यमातून अराजकता पसरवली जात आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही. 

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...