ताज्या बातम्या

भारत जोडो यात्रेची राजधानीत एन्ट्री; लाल किल्ल्यावर आज राहुल गांधींची जाहीर सभा

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला 7 सप्टेंबरला कन्याकुमारी येथून सुरुवात झाली होती. या यात्रेनं आतापर्यंत 9 राज्यांचा समावेश केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला 7 सप्टेंबरला कन्याकुमारी येथून सुरुवात झाली होती. या यात्रेनं आतापर्यंत 9 राज्यांचा समावेश केला आहे. यामध्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांचा समावेश आहे. मात्र, हरियाणात दुसरा टप्पा अजून व्हायचा आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर 3 जानेवारी 2023 रोजी पदयात्रा पुन्हा सुरू होईल. नवीन वर्षात यूपी, हरियाणानंतर ही यात्रा पुन्हा पंजाब आणि जम्मू-काश्मीरसाठी रवाना होणार आहे.

आज शनिवारी (24 डिसेंबर) भारत जोडो यात्रेचा 180वा दिवस असून राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात सुरू असणारी ही यात्रा शनिवारी सकाळी साडेसहा वाजता बदरपूर सीमेवरून दिल्लीत दाखल झाली आहे. भारत जोडो यात्रा सकाळी साडेदहा वाजता आश्रम चौकाजवळ पोहोचेल. यानंतर दुपारी साडेचार वाजता ही यात्रा लाल किल्ल्यावर पोहोचेल. दरम्यान, दिल्ली काँग्रेसनं भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मास्क घालून येण्याचे निर्देश दिले आहेत.

भारत जोडो यात्रेत सहभागी लोक दुपारी आश्रम चौकाजवळील धर्मशाळेत जेवण आणि विश्रांती घेतील. त्यानंतर ही यात्रा निजामुद्दीन, इंडिया गेट सर्कल, आयटीओ, दिल्ली कॅंट, दर्यागंज मार्गे लाल किल्ल्यावर पोहोचेल. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक नेते राजघाट, वीरभूमी, शक्तीस्थळ आणि शांती वन येथे पोहोचून श्रद्धांजली वाहणार आहेत.सर्वसामान्य आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसह काही सिनेकलाकारही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. आज प्रसिद्ध अभिनेते कमल हसन भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत सहभागी होणार आहेत.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result