अकोलाः राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत-जोडो यात्रा विदर्भात आहे. अकोले येथे राहुल गांधी यांची पत्रकार परिषद झाली. राहुल गांधी यांनी शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांचा शेतकऱ्यांसाठीचा प्लॅन सांगितला. गरीब शेतकऱ्यांना कशी मदत केली पाहिजे हे सविस्तर गांधी यांनी मांडले आहे.
सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप गांधी यांनी केलाय. जेव्हा शेतकरी कर्जबाजारी होते. तेव्हा सरकारची जबाबदी त्यांचे रक्षण करण्याची आहे. परंतु सध्याच्या सरकारची ती मानसिकता नाही. शेती करणाऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे, अशी टीका गांधी यांनी केली. शेतकरी हा चोवीस तास काम करतो. त्यांचे रक्षण करणे सरकार व जनतेचे काम आहे. त्यांच्या पिकांना योग्य किंमत दिली पाहिजे. त्यासाठी काँग्रेसची न्याय योजनेची संकल्पना आहे. त्या प्रत्येक महिन्याला गरीब कुटुंबाना 72 हजार रुपये वर्षाला मिळतील. त्यात गरीब शेतकरी येईल. त्यांचे रक्षण होईल. कर्ज जास्त झाल्यास कर्जमाफी केली पाहिजे, असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.
यूपीएच्या काळात सरकारने शेतकऱ्यांचा विचार केला. विदर्भाच्या शेतकऱ्यांचा विचार करून एकदम पॅकेज दिले. त्यातून शेतकरी कर्जातून बाहेर आले, असे गांधी यांनी सांगितले.