दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा यंदा 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे.यावेळी दहावी- बारावी परीक्षेत यंदा बैठे पथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे.
अलिकडच्या काळात मोबाईलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका व्हायरल करण्याचे मोठ्या प्रमाणावर काम केलं जाते. हे आता थांबणार आहे. यासंदर्भात राज्य मंडळाने एक समिती स्थापन करून याबाबत निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.राज्य मंडळाने आता दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिका मोबाईलच्या माध्यमातून व्हायरल केल्यास परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला पाच वर्षे डिबार करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पाच वर्षे परीक्षा देण्यापासून निलंबित केले जाईल.
यासोबतच राज्य मंडळाने ज्या ठिकाणी दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहे. त्या केंद्रासहित सर्व शाळांना सूची पाठविली आहे. त्यामुळे शाळांच्या माध्यमातून राज्य मंडळाने ही कठोर भूमिका घेतल्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला आहे.कॉपी प्रकरणात इतर कुणाचा सहभाग असल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असा नियमच लागू करण्यात आला आहे. यापूर्वी कॉपी आढळून आल्यास तीन वर्षे निलंबित केले जात होते.