अमोल धर्माधिकारी, पुणे
पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या कल्पनांसाठी, वेगळ्या कृतीसाठी पुणेकर जगप्रसिद्ध आहेत. अशाच एका पुणेकरांना आणखी एक असा वेगळेपण केले की त्याची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली. या विक्रेत्याने चक्क हप्त्यावर आंब्याची पेटी विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
सिंहगड रस्त्यावरील गुरुकृपा ट्रेडर्सचे गौरव सणस यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली. आंबा हा फळांचा राजा आहे. त्यामुळे उन्हाळा आला की आंबा खाण्यासाठी लहान थोर असे सगळेच जण उत्सुक असतात. मात्र सुरुवातीच्या काळात आंब्यांची आवक कमी असते त्यामुळे साहजिकच आंब्याचे दर हे गगनाला भिडलेले असतात.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हे आंबे घेणे परवडत नाही. त्यातूनच त्यांना ईएमआयवर आंबे विकले तर ही कल्पना सुचली. आणि त्यानंतर त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली. गौरव सणस यांच्या दुकानावर आता येथे ईएमआय वर आंबे मिळतील असा बोर्ड लावण्यात आला आहे. आणि त्यांना प्रतिसाद ही मिळतोय