Pune Zilla Parishad Team Lokshahi
ताज्या बातम्या

Pune Zilla Parishad गट रचना जाहीर; शिरुर तालुक्यात मोठा बदल

गट रचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली जाहीर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

प्रमोद लांडे | शिरुर : पुणे जिल्हा परिषद (Pune Zilla Parishad) गट व पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) गणांची प्रारूप प्रभाग रचना नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी जाहीर केली आहे. त्याप्रमाणे शिरुर तालुक्यात एकूण सात जिल्हा परिषद गटांची संख्या होती. ती वाढवून आता आठ इतकी करण्यात आली आहे. तर पंचायत समिती गणांची संख्या चौदावरून सोळा अशी वाढवण्यात आली आहे. यामध्ये अनेक जिल्हा परिषद गटांमध्ये मोठा बदल झाला आहे.

दरम्यान यापूर्वी शिरूर तालुक्यात एकूण सात जिल्हा परिषद गट होते. यामध्ये एक जिल्हा परिषद गटाची संख्या वाढवली आहे. नव्याने वाढवलेल्या गटाचे नाव सणसवाडी - कोरेगाव भीमा असे आहे. या गटामध्ये यापूर्वी केंदूर - पाबळ, शिक्रापूर - कोरेगाव भीमा गटात असलेली काही गावे नव्याने स्थापित झालेल्या सणसवाडी - कोरेगाव भीमा या गटात समाविष्ट करण्यात आली आहेत. या नवीन गटामध्ये दरेकरवाडी, डिंग्रजवाडी, सणसवाडी, पिंपळे जगताप, वाजेवाडी, वढू बु, आपटी, कोरेगाव भीमा, वाडा पुनर्वसन या गावांचा समावेश आहे. यामध्ये तळेगाव ढमढरे - रांजणगाव सांडस या गटाची मोठी विभागणी झाली आहे. तर तळेगाव ढमढेरे - शिक्रापूर असा नवीन गट करण्यात आला आहे. यामध्ये तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, विठ्ठलवाडी आणि धानोरे या केवळ चार गावांचाच समावेश असणार आहे.

त्याचबरोबर रांजणगाव - कारेगाव गटात यापूर्वी असलेल्या कोंढापुरी या गावाचा समावेश थेट न्हावरा- निमगाव म्हाळुंगी या गटात त्याचबरोबर कान्हूर मसाई आणि मिडगुलवाडी या गावांचा समावेश केंदूर - पाबळ गटात करण्यात आला आहे. तर केंदूर - पाबळ गटातील पिंपळे जगताप, वाजेवाडी, वढू बु, आपटी ही गावे कमी करण्यात आली आहेत. त्याचबरोबर टाकळी हाजी गटातील आमदाबाद या गावाचा रांजणगाव - कोरेगाव गटामध्ये समावेश करण्यात आला आहे.

यापूर्वी शिरुर - हवेली विधानसभा मतदार संघातील काही गावे ही शिरुर - आंबेगाव विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद गटात समाविष्ट होती. मात्र, यावेळी दोन्ही विधानसभा मतदार संघातील गावे आणि जिल्हा परिषद गट वेगवेगळे करण्यात आले आहेत. त्याचबरोबर शिरुर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद गटामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे बदल नव्याने जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेत पाहायला मिळतात. या जाहीर झालेल्या गट रचनेवर हरकती घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने ८ जूनपर्यंत मुदत दिलेली आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result