ताज्या बातम्या

पुण्यात झिका व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

पुणे शहरात झिकाचा धोका वाढत चालला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

पुणे शहरात झिकाचा धोका वाढत चालला आहे. पुणे शहरात एरंडवणा आणि मुंढव्यात झिकाचे तीन रुग्ण आढळल्याची माहिती मिळत आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 20 जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता पुण्यात झिका व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलं आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या वीस जणांची रक्त तपासणी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

रुग्ण आढळलेल्या भागात महापालिकेकडून 3000 घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून शहरात आढळलेल्या झिका विषाणूंच्या तीन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश