ताज्या बातम्या

पुणे महापालिका शहरातील भूमिगत विहिरींचा शोध घेणार

Published by : Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

पुणे महापालिका शहरातील भूमिगत विहिरींचा शोध घेणार असल्याची माहिती मिळत आहे. महापालिकेकडून लवकरच कामाची निविदा काढली जाणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील अपघातामुळे महापालिका विहिरींचा शोध घेणार आहेत.

पुण्यात लक्ष्मी रस्त्यावर सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात तुंबलेल्या सांडपाण्याची वाहिनी स्वच्छ करताना फेवर ब्लॉक खचल्याने पालिकेचा सेटिंग मशीन ट्रक खड्ड्यात कोसळल्याची घटना घडली होती. त्या जागी विहीर असल्याची माहिती मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने बुजवलेल्या विहिरींचा शोध घेण्यात सुरुवात करण्यात आली असून शहरात 2010 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात 399 विहिरी आढळल्या होत्या. त्यामधील बहुतांश विहीरी या शहराच्या मध्यभागात असून 95 टक्के विहिरी बुजवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Supriya Sule: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

Arya Jadhao: आर्याने केली बिगबॉसच्या घरातील सदस्यांची पोलखोल...

Siddhivinayak Mandir: सिद्धिविनायक प्रसादाच्या लाडूंवर उंदरांची पिल्ले; ट्रस्टने सर्व आरोप फेटाळले

Sanjay Raut: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरुन संजय राऊतांकडून शंका; म्हणाले...

Big Boss Marathi 5: 100 दिवसाचा खेळ आता 70 दिवसात संपणार, "या" दिवशी पार पडणार ग्रँड फिनाले