अमोल धर्माधिकारी, पुणे
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात आत्तापर्यंत विशाल अग्रवाल याच्यावर तीन गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. आता ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी विशाल अग्रवाल याला अटक होण्याची शक्यता आहे. विशाल अग्रवाल याच्याविरोधात आणखीन एक प्रोडक्शन वॉरंट काढण्यात आलं आहे.
तसेच ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या ब्लड रिपोर्ट फेरफार केल्याप्रकरणी विशाल अग्रवाल याच्याविरोधात वॉरंट काढण्यात आलं आहे. यासोबतच विशाल अग्रवाल याने अजय तावरे याला फोन केल्याची देखील माहिती आहे.