ताज्या बातम्या

'सार्वजनिक गणेशोत्सव आता बंद व्हायला हवेत' शुभांगी गोखलेंचं स्पष्ट मत

Published by : shweta walge

देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी, गल्लीबोळात  गणपती विराजमान होतात. गणेशोत्सव हा सगळ्यांसाठीच जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकमान्य टिळकांनी या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली आणि त्यानंतर हळूहळू या उत्सवाचं स्वरुप मोठं होऊ लागलं. यावरच मराठी मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवलेल्या अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी सार्वजनिक गणेशोत्सवावर महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

अभिनेत्री शुभांगी गोखले या सध्या नुकतच प्रदर्शित झालेल्या ‘घरत गणपती’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकत्याच ‘तारांगण’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल आपलं परखड मत मांडलं आहे.

गणेशोत्सवाबद्दल सांगताना शुभांगी गोखले म्हणाल्या, “मी मूळची मराठवाड्याची असल्याने गणेशोत्सवाच्या माझ्या अशा फारशा आठवणी नाही आहेत. पश्चिम महाराष्ट्रात घरोघरी गणपती असतो आणि मुंबईत अलीकडे बाहेरून आलेली माणसं सुद्धा गणपती बसवतात. नेपाळ, युपीवरून आलेले लोक सुद्धा गणेशोत्सव साजरा करतात. पण, खरा गणपती हा कोकणातला आहे.”

'मी पुण्यातलेही मानाचे गणपती पाहिलेत. मुंबईतलेही पाहिले आहेत. पण आता त्याचं जे औडंबर झालंय, त्यामुळे फार चुकीच्या गोष्टी सुरु आहेत. तुम्ही सगळे सार्वजनिक गणपती करता, आराधना करता पण आता हे सार्वजनिक गणपती बंद झाले पाहिजेत. रस्त्याच्या मध्यभागी तुम्ही ते करता आणि नंतर त्याच्या पाठिमागे तुम्ही रात्री दारु पिता, पत्ते खेळता, हे कुणी अमान्य करुच शकत नाही. याची आता गरज नाहीये. यामुळे आपणच आपल्या देवाचा अपमान करतोय.' हल्ली तर छोटी छोटी गावं देखील एक गाव एक गणपती करतात. मग हे तुम्ही का नाही करु शकत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

भूषण प्रधान, निकिता दत्ता, अश्विनी भावे, अजिंक्य देव, शुभांगी गोखले, संजय मोने ही सगळी मंडळी असलेला घरत गणपती हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नात्यांची एक सुरेख गोष्ट या सिनेमातून सांगण्यात आली आहे.

Baramati | Supriya Sule | बॅनरवर सुप्रिया सुळेंचा 'भावी मुख्यमंत्री' उल्लेख | Marathi News

Ramdas Athawale | 'देशात जातनिहाय जनगणना होणं आवश्यक'; रामदास आठवलेंची मागणी

Narayan Rane | शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे राणेंसाठी लोकसभेत खर्च? ; नारायण राणेंवर गंभीर आरोप

shirdi saibabatemple | शिर्डीत साईबाबांच्या चरणी हिरेजडीत सुवर्णमुकुट अर्पण | Marathi News

Solapur | भर पावसात मराठा आंदोलकांनी अडवला अजित पवारांचा ताफा, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी