अप्पर वर्धा धरणग्रस्तांकडून मंत्रालयात आंदोलन करण्यात येत आहे. मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर आंदोलकांनी उड्या मारुन आंदोलन केलं असल्याची माहिती मिळत आहे. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या आवारात पहिल्या माळ्यावर जाळी लावण्यात आली आहे. कुणीही उडी मारुन आत्महत्या करु नये, सुरक्षेच्या कारणास्त या जाळी बांधण्यात आल्या आहेत.
अप्पर वर्धा कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे. पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी येथे अप्पर वर्धा धरण आहे. गेल्या 103 दिवसांपासून मोर्शीच्या तहसील कार्यालयासमोर या सर्व धरणग्रस्तांचं आंदोलन सुरु आहे. पण त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी आज थेट मंत्रालयात आगळ्यावेगळ्या पद्धतीचं आंदोलन सुरु केलं. असं त्यांचे म्हणणं आहे.