नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर, नोटबंदी आदींसारख्या निर्णयांनंतर आता मोदी सरकार नोटांवरील फोटोमध्ये मोठा फेरबदल करण्याची शक्यता आहे. नोटांवर (Notes) महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या फोटोसोबत आता रविंद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) आणि एपीजे कलाम (A. P. J. Abdul Kalam) यांचे फोटो दिसणार आहेत. महापुरुषाचा फोटो नोटांवरती लावण्याची पहिलीच वेळ असणार आहे.
अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोटा बदलण्याची तयारी करत आहेत. हा बदल नोटांच्या काही मालिकांमध्ये केला जाऊ शकतो. काही भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींच्या चित्रासोबत एपीजे अब्दुल कलाम आणि रविंद्रनाथ टागोर यांचेही चित्र छापले जाऊ शकते. म्हणजे की, चलनी नोटांवर एकाधिक-अंकी वॉटरमार्क समाविष्ट करण्याची शक्यता तपासण्यासाठी फोटो बदलला जाऊ शकतो.
यासाठी आरबीआय आणि सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने टागोर आणि कलाम यांचे वॉटरमार्क असलेल्या काही नोट्स आयआयटी-दिल्लीचे एमेरिटस प्रोफेसर दिलीप टी शहानी यांना अभ्यासासाठी पाठवल्या आहेत. या नोटा त्याला वेगवेगळ्या सेटमध्ये पाठवण्यात आले आहे. प्रत्येक संच, त्यातील त्रुटी, त्याची खासियत या सर्व मुद्यांचा अभ्यास करून त्याचे उत्तर देण्यात येईल.