रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजार रुपयांच्या नोटेवर मोठा निर्णय घेतला आहे. 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढणार आहे. मात्र, ती कायदेशीर निविदा राहील. आरबीआयने बँकांना 2 हजार रुपयांच्या नोटा देणे तात्काळ बंद करण्याच्या सल्ला दिला आहे. रिझर्व्ह बँकेने 'क्लीन नोट पॉलिसी' अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2 हजारांच्या नोटा बँकेतून बदलून घेता येतील.
याच पार्श्वभूमीवर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मागील नोटबंदीच्या निर्णयामुळे स्वत: मोदी तोंडघशी पडले, नोट बदली करण्यासाठी लोकांनी बँकांबाहेर गर्दी केली आणि शेकडो माणसं मृत्यूमुखी पडले. नोटबंदीमुळे लोकांना वस्तू घेता आल्या नाही आणि जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागला. मागच्या नोटबंदीच्या निर्णयाप्रमाणे हा नोटबंदीचा निर्णयही बालिश आहे. असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.